Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना भवन, शाखा आणि पक्षनिधीसाठी याचिका

ठाकरे गटासमोर पुन्हा नवे संकट ः24 एप्रिलला होणार सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गेले असून, ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे

पुण्यात आगीची मोठी घटना घडली
उदगीरमध्ये राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा
धक्कादायक, आरोपीने दिली 9 गुन्ह्याची कबुली

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ठाकरे गटाच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गेले असून, ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गटाला मिळाले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतांना, वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, शिवसेना भवन, शाखा आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्याची मागणी केली आहे. त्यावर 24 एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निर्णय दिला आहे. याचा आधार घेत वकील.आशिष गिरी यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेच्या संपत्तीवर दावा करण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवन, मुंबईमधील शिवसेनेच्या शाखा आणि पक्षाचा पक्षनिधी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. मुळ शिवसेनेची मोठा पक्षनिधी आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक संस्था, कार्यालयं, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालय याकडे कशा प्रकारे पाहते हे महत्त्वाचे आहे. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नावे बँक खाते केवळ शिवसेनेचे असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.  दरम्यान, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला असला तरी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजूनही प्रलंबितच आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील शिवसेना कुणाची, पक्षनिधी कुणाचा, खाते कुणाचे, यावरील प्रश्‍नांची उत्तरे अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे. पक्षनिधी कुणाचा, शिवसेना भवन कुणाला द्यायचे, याचा निर्णय येण्यासाठी बराच मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तरी, त्यातून एकतर शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा निर्णय येवू शकतो. अशावेळी आमदारांना अपात्र ठरवले तरी, बहुमताच्या जोरावर भाजप सहज सत्ता स्थापन करेल, आणि जरी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजुने निर्णय दिला तर, सरकार कायम राहील. मात्र शिवसेना भवन, पक्षनिधीसाठी शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयातूनच निर्णय मिळवावा लागणार आहे.

COMMENTS