Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर; भरारी पथकाची कारवाई; १२ सिलेंडर जप्त

श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात भरारी पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध २५ हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. शासनाच्या नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती गरजांसाठीच करणे बंधनकारक आहे. मात्र काही हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने शहरातील विविध हॉटेल, चहा टपरी, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधितांकडून एकूण १२ घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. या कारवाईत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी होते. अधिकाऱ्यांनी व्यावसायिक आस्थापनांना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. या अचानक झालेल्या तपासणीमुळे शहरातील हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये  खळबळ उडाली आहे.

तेहरान हल्ल्यानंतर मोजतबा खामेनेई कोमामध्ये
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी
दूरच्या युद्धाचे स्वयंपाकघरावर सावट !

श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात भरारी पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध २५ हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.

शासनाच्या नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती गरजांसाठीच करणे बंधनकारक आहे. मात्र काही हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.

भरारी पथकाने शहरातील विविध हॉटेल, चहा टपरी, खानावळी तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधितांकडून एकूण १२ घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले.

या कारवाईत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी होते. अधिकाऱ्यांनी व्यावसायिक आस्थापनांना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. या अचानक झालेल्या तपासणीमुळे शहरातील हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये  खळबळ उडाली आहे.

COMMENTS