Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करा

आ. आशुतोष काळें यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

कोपरगाव/प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरी कालव्या लगतच्या गावातील रोहीत्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी स

श्री साईगाव पालखीचे पूजन करून आ. काळेंनी दिल्या शुभेच्छा
जायकवाडीत पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून शासनास सादर करावा
चित्रकला स्पर्धा उद्योन्मुख चित्रकारांसाठी उत्तम व्यासपीठ ः आ. काळे

कोपरगाव/प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरी कालव्या लगतच्या गावातील रोहीत्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी किमान दोन तास कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करावा. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव मतदारसंघाच्या अनेक गावातील गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या लगतच्या गावातील रोहीत्रांचा वीज पुरवठा 3 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महावितरणला दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पाण्याचे पात्र देखील कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. विहीर,बोअरवेलच्या माध्यमातून शिल्लक असलेले पाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पाणी असून देखील शेतकरी व कालव्या लगत वास्तव्यास असणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या कालव्यांलगतच्या गावातील रोहीत्रांचा किमान दोन तास वीजपुरवठा सुरु करावा. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.

COMMENTS