मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील उत्तर उपविभाग भायखळा मुंबईतील उपअभियंता अजय बापट यांनी रवींद्र नाट्य मंदिराचे रेन्युशन करण्याच्या कामांमध्ये

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील उत्तर उपविभाग भायखळा मुंबईतील उपअभियंता अजय बापट यांनी रवींद्र नाट्य मंदिराचे रेन्युशन करण्याच्या कामांमध्ये 150 कोटी तर याच नाट्य मंदिराच्या मेन्टेन्सच्या कामांमध्ये 100 कोटींचा अपहार केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
उप अभियंता अजय बापट यांनी रवींद्र नाट्य मंदिराच्या कामांमध्ये जो 250 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तो बघितला तर, इतक्या मोठ्या रकमेमध्ये चार नाट्यमंदिर उभारता आले असते, मात्र शासकीय निधी या नाट्य मंदिराच्या कामांसाठी वापरल्याचे भासवून संगनमताने हा निधी बापट यांनी हडप केल्याचे दिसून येत आहे. बापट आणि त्यांचे सहकारी शाखा अभियंता अदित्य सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता श्रीमती निलीमा काकुलते, प्रवीण फाटेकर, रोहित कुडतरकर या अधिकार्यांनी संगनमताने मिळून कोट्यावधी निधींचा अपहार करण्याचे समोर आले आहे.
उपअभियंता अजय बापट यांच्या अखत्यारीत नायगाव, माहीम आणि दादर येथील पोलीस वसाहतींसह रेल्वे पोलीस वसाहतींच्या देखभाल व दुरुस्तीची कामे येतात. या कामांदरम्यान विविध योजनांतर्गत निधीचा वापर करताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित कामांमध्ये विविध दुरुस्ती योजनांमधून मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आल्याने अंदाजे 150 ते 200 कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला असून, रवींद्र नाट्य मंदिराच्या देखभाल दुरूस्तीमध्ये 100 कोटी तर रेन्युएशनच्या कामांमध्ये 150 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी राज्य शासनाकडे तक्रार करत संबंधित अधिकार्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच या अभियंत्यांच्या मालमत्तेची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाटील आणि पनाडच्या कामांचा पंचनामा उद्यापासून
उपविभाग क्रमांक-2 भायखळा मुंबईचे उपअभियंता नंदकुमार पाटील, आणि उपविभाग क्रमांक-1 वरळीचे उपअभियंता अनिल पनाड यांनी देखील आपल्या उपविभागात कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला असून, याप्रकरणी लवकरच संपूर्ण सविस्तर वृत्तांत लवकरच आम्ही पुराव्यानिशी मांडझार आहोत.
बापट तुम्ही डोक्याने ‘विद्या’ विभूषित आहात का?
उपअभियंता अजय बापट नेहमीच आपण ‘विद्या’ विभूषित असल्याचा दावा करतात. आपलं विद्याप्रेम अर्थात पुस्तकांवरील प्रेम जपण्यासाठी ते नेहमीच आपल्या गाडीत विद्येचा व्यासंग अर्थात पुस्तकांना सोबत घेऊन फिरतात, मात्र खरंच उप अभियंता बापट यांना ‘विद्ये’चा व्यासंग आहे का? जर तसे असते तर, कदाचित बापट यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केला नसता, मात्र बापट यांचे ‘विद्या’प्रेम हे खोटे आणि लबाड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बापट यांच्या ‘विद्या’ विभूषित पणावर संशय घेतांना दिसून येत आहे.
वर्क ऑर्डर एकच, देयके काढली दोनदा
उप अभियंता अजय बापट यांचे प्रताप सांगावे तेवढे थोडेच आहे. कारण बापट यांनी आपल्या कार्यकाळात एकाच वर्क ऑर्डरच्या कामांचे दोनदा देयके अदा करत या बिलाच्या पोटी काढण्यात आलेली रक्कम हडप केल्याचे दिसून येतआहे. 20559 आणि 2216 यासोबतच डीपीटीसीच्या कामांच्या वर्क ऑर्डर एकच असतांना देखील दोन बिलं दोन वेगवेगळे देयके अदा करून शासनाच्या निधींचा मोठा अपहार बापट यांनी केल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.

COMMENTS