Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष सुरूच

इराणचा इस्रायलवर हल्ला; अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावातेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाचा बुधवारी बाराव

नितेश राणेंच्या गाडीला अपघात.
नारी शक्ती वंदन कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
केंद्राने लावले कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क

इराणचा इस्रायलवर हल्ला; अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा
तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाचा बुधवारी बारावा दिवस लागला असून तणाव अधिक तीव्र झाला आहे. इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणी लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, इस्रायलसह मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या काही लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दिलेल्या माहितीनुसार कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांनाही लक्ष्य करण्यात आले. कुवेतमधील अल-उदयरी हेलिकॉप्टर हवाई तळ, मोहम्मद अल-अहमद नौदल तळ आणि अली अल-सलेम हवाई तळावर क्षेपणास्त्रे व ड्रोनद्वारे हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच बहरीनमधील अमेरिकन सैन्य तैनात असलेल्या नौदल तळावरही हल्ला केल्याचे सांगितले गेले. काही इराणी माध्यमांनी अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यालये आणि डेटा केंद्रांवर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य लक्ष्यांच्या यादीत गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, आयबीएम आणि ओरॅकलसारख्या कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. इस्रायल तसेच दुबई आणि अबू धाबीतील या कंपन्यांची कार्यालये आणि डेटा केंद्रे धोक्याच्या कक्षेत येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही परिस्थितीवर चर्चा होणार आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डनवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन करणार्‍या ठरावावर आज मतदान होण्याची शक्यता आहे. सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीच्या प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत जवळपास वीस हजार नागरी इमारतींना हानी पोहोचली आहे. यामध्ये सुमारे 77 वैद्यकीय केंद्रे आणि 65 शैक्षणिक संस्थांचा समावेश असून मदतकार्यांसाठी वापरल्या जाणार्‍या काही केंद्रांनाही फटका बसला आहे. त्याचवेळी इराणमधील मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध व्यक्त होत आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे वृत्त असून निष्पाप नागरिकांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS