देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ८ मार्च) रात्री उशिरा घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांसह ११ अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (सर्व रा. बुरुडगाव, ता. अहिल्यानगर) तसेच महेश निमसे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्यासह इतर ११ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ मार्च रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ग्रीन हॉटेल चौक येथे आरोपी त्यांच्या स्कॉर्पिओ व विटकरी रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले होते. त्यांच्या वाहनाला कंटेनर याचा धक्का लागल्याच्या कारणावरून ते कंटेनर चालकाला लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करण्याच्या तयारीत होते. ही घटना पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्या बीट हद्दीत घडत असल्याने त्यांनी मोबाईलद्वारे घटनेचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी वैराळ यांच्यावरच हल्ला चढविला. आरोपींनी लोखंडी फायटर, लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतर अनोळखी आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केली. दरम्यान आरोपी महेश निमसे याने फिर्यादीचा मोबाईल हँडसेट जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही दखल घेतली असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.

देवळाली प्रवरा : राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ८ मार्च) रात्री उशिरा घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांसह ११ अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (सर्व रा. बुरुडगाव, ता. अहिल्यानगर) तसेच महेश निमसे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्यासह इतर ११ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ मार्च रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ग्रीन हॉटेल चौक येथे आरोपी त्यांच्या स्कॉर्पिओ व विटकरी रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले होते. त्यांच्या वाहनाला कंटेनर याचा धक्का लागल्याच्या कारणावरून ते कंटेनर चालकाला लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करण्याच्या तयारीत होते.
ही घटना पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्या बीट हद्दीत घडत असल्याने त्यांनी मोबाईलद्वारे घटनेचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी वैराळ यांच्यावरच हल्ला चढविला. आरोपींनी लोखंडी फायटर, लोखंडी गज व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतर अनोळखी आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केली.
दरम्यान आरोपी महेश निमसे याने फिर्यादीचा मोबाईल हँडसेट जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही दखल घेतली असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.

COMMENTS