Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : पश्‍चिम आशियातील युद्धपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम श

अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.
जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पश्‍चिम आशियातील युद्धपरिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दांत फेटाळले आहे. राज्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नसून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी रविवारी केले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही माध्यमांमध्ये इंधन टंचाईची शक्यता व्यक्त करणार्‍या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्या. प्रत्यक्षात राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. ऊर्जा सुरक्षेबाबत केंद्र सरकार सतत दक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात उद्भवणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पश्‍चिम आशियातील संघर्षामुळे इंधन आणि गॅसच्या किमतींवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. घरगुती गॅसच्या दरात सुमारे साठ रुपयांची वाढ झाली असून व्यावसायिक गॅसच्या दरातही मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हॉटेल व खानावळ व्यवसायिकांपुढे खर्च वाढीचे आव्हान उभे राहिले आहे. काही शहरांमध्ये गॅस वितरणात उशीर होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. विशेषतः पुणे येथे काही नागरिकांनी गॅस वेळेवर मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. गॅस, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती बजेटवर ताण वाढत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. तथापि, राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS