Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर सर्वपक्षीय मोर्चा

पाणीपट्टी दरवाढीविरोधात एल्गार ; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देवळाली प्रवरा : नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढील सभेत पाणीपट्टी वाढ रद्

राहुरीत पतीचा गळा दाबून खून
डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)
राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !

पाणीपट्टी दरवाढीविरोधात एल्गार ; सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

देवळाली प्रवरा : नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढील सभेत पाणीपट्टी वाढ रद्द केली नाही तर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागून नागरिकांना न्याय देणार असल्याचे सर्व पक्षिय नेत्यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर काढलेल्या पाणपट्टी वाढीविरोधातील मोर्चात सांगितले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेने केलेल्या पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शुक्रवारी (दि.६)  सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयावर सर्वपक्षीयांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

बाजार तळ येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर येथून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी “वाढीव पाणीपट्टी रद्द करा”, “पाणीपट्टी दरवाढ कमी करा”, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी नगरपरिषद सत्ताधारी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीचा दर वाढविल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अथवा दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. यासंदर्भात सर्वपक्षीयांच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील म्हणाले की पुढील सभेमध्ये आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करून मी निश्चित मुद्दा मांडून आपल्या प्रतिक्रिया सभेत मांडणार आहे. दरम्यान, वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दात मागणार असल्याचे सर्व पक्ष नेतेमंडळी यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी व पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता.

यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे,प्रहारचे आप्पासाहेब ढुस, प्रशांत मुसमाडे, दत्ता कडू,काँग्रेसचे वैभव गिरमे,वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, नगरसेवक दासू पठारे, सुनीता थोरात,पल्लवी ढुस, शरद वाळुंज,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,प्रशांत काळे, अनिल चव्हाण,प्रकाश सोनी, किशोर कोबरने,बाळासाहेब खुरूद  आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS