बेलापूर : हसणे हे माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक औषध मानले जाते. हसल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. म्हणू

बेलापूर : हसणे हे माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक औषध मानले जाते. हसल्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. म्हणूनच हसणे हे अनेक आजारांवरचे प्रभावी औषध आहे. त्यामुळे “हसण्यावर टॅक्स नाही” असे विचार अहिल्यानगर येथील किलबिल संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध नाट्य कलावंत डॉ. विजयकुमार जोशी यांनी व्यक्त केले.
येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत “हसण्यावर टॅक्स नाही” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे हे होते. यावेळी व्यासपीठावर बहिःशाल व्याख्यानमालेचे महाविद्यालयीन केंद्रकार्यवाह प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा. डॉ. अशोक माने,प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. ओंकार मुळे, प्रा. डॉ. सुनीता पठारे, प्रा. दीपाली खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमातील द्वितीय सत्रात प्रा. डॉ.गोकुळ क्षीरसागर व प्रा.योगेश रोकडे यांनी “नाटक तंत्र आणि मंत्र” या विषयावर उपस्थितांना सत्यम शिवम सुंदरम या नाट्यकृतीतून प्रबोधन केले. यावेळी प्राचार्या प्रो.डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की, हसण्याने आयुष्य वाढते. शरीर निरोगी राहून प्रतिकार क्षमतेत वाढ होते. हसणे हे कोणतेही पैसे न लागणारे साधन असून हसण्यामुळे जीवनशैलीत वाढ होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनीता पठारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रकाश देशपांडे यांनी मानले.

COMMENTS