Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनाथ मुलांच्या हस्ते ‘काळीमा’ पोस्टरचे अनावरण

जामखेड : भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या, भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या “काळीमा” या लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनाथ मुलांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जामखेड येथील निवारा बालगृह, मोहा फाटा, समता भूमी बीड रोड येथे ऍड. अरुण जाधव नगरसेवक यांचा ‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण अनाथ मुलांच्या हस्ते करण्यात आले. ‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मची टॅगलाईन “विशिष्ट जातीला लागलेला कलंक” अशी आहे. भटके विमुक्त, आदिवासी जातीला लागलेला ठपका, म्हणजेच कलंक याचे प्रतीक म्हणून या चित्रपटाला ‘काळीमा’ हे नाव देण्यात आले आहे. यावेळी बोलताना अरुण जाधव यांनी भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि जाळपोळ,जीवघेणे हाल्ले,सामाजिक कलंकाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. अरुण जाधव स्वतः भटके-विमुक्त समाजातून आलेले असल्यामुळे या समाजाच्या वेदना आणि संघर्षाची त्यांना जवळून जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले. या शॉर्ट फिल्मची कथा, पटकथा आणि दिग्दर्शक  सचिन चव्हाण यांनी केले असून निर्माते उमा जाधव यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमास सचिन भिंगारदिवे, रेश्मा बागवान, बापू ओव्होळ, ऋषिकेश गायकवाड, संगीता केसकर, जाकीर मामा, गौतमी गंगावने, छाया मोरे, भक्ती पवार, संदीप आखाडे व बालगृहातील मुले, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार वैजीनाथ केसकर यांनी मानले.

पहाटे एकीकडे भक्तिसांगित दुसरीकडे दुधाचा काळा धंदा
रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी प्रफुल सोळंकी
जामखेडमध्ये ड्रग्ज कनेक्शन ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 

जामखेड : भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या, भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या “काळीमा” या लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनाथ मुलांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जामखेड येथील निवारा बालगृह, मोहा फाटा, समता भूमी बीड रोड येथे ऍड. अरुण जाधव नगरसेवक यांचा ‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण अनाथ मुलांच्या हस्ते करण्यात आले.

‘काळीमा’ या शॉर्ट फिल्मची टॅगलाईन “विशिष्ट जातीला लागलेला कलंक” अशी आहे. भटके विमुक्त, आदिवासी जातीला लागलेला ठपका, म्हणजेच कलंक याचे प्रतीक म्हणून या चित्रपटाला ‘काळीमा’ हे नाव देण्यात आले आहे.

यावेळी बोलताना अरुण जाधव यांनी भटके-विमुक्त आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. भटके-विमुक्त समाजावर, आदिवासी यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि जाळपोळ,जीवघेणे हाल्ले,सामाजिक कलंकाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. अरुण जाधव स्वतः भटके-विमुक्त समाजातून आलेले असल्यामुळे या समाजाच्या वेदना आणि संघर्षाची त्यांना जवळून जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले. या शॉर्ट फिल्मची कथा, पटकथा आणि दिग्दर्शक  सचिन चव्हाण यांनी केले असून निर्माते उमा जाधव यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमास सचिन भिंगारदिवे, रेश्मा बागवान, बापू ओव्होळ, ऋषिकेश गायकवाड, संगीता केसकर, जाकीर मामा, गौतमी गंगावने, छाया मोरे, भक्ती पवार, संदीप आखाडे व बालगृहातील मुले, स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार वैजीनाथ केसकर यांनी मानले.

COMMENTS