Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा

नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे जंगी स्वागतकेज । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळकटी देण्

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखा; शिवसेनेचा नगरपालिकेवर आंदोलनाचा इशारा
जिल्हापरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार
बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली

नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे जंगी स्वागत
केज । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने बीड विभाग व बीड मंडळ कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. लातूर परिमंडळाचे अध्यक्ष आर. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
या प्रसंगी केंद्रीय उपसरचिटणीस मा. एन. डी. पोटभरे तसेच लातूर परिमंडळाचे कोषाध्यक्ष मा. तेलंग साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेची भूमिका अधिक सक्षम करत विद्युत कर्मचार्‍यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी अभ्यासू व कार्यक्षम पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अध्यक्षपदी अविनाश सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी प्रदीप वाघमोडे, सचिवपदी शेख मुजमील तर कोषाध्यक्षपदी हनुमंत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून रमाकांत डिकले, विशाल रामेश्वर गायकवाड, त्रिबंक रोडे, सय्यद रशीद व बादशहा खान यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी विक्की वाघमारे व अतुल सिताप यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्य संघटक म्हणून नागेश हळगावकर व सतेज सोनवणे तर प्रसिद्धी प्रमुखपदी महेश भोडंवे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणी संघटनेचा विचार तळागाळातील कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. निवड झालेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे कर्मचारी वर्ग, सामाजिक क्षेत्र तसेच विविध संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. केज येथील शिवाजी घुले यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS