Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जबाजारीला कंटाळुन शेतकर्‍याची आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील घटना.

माजलगाव प्रतिनिधी - तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे (52 वर्षे) यांनी कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांचा सततच्या तगाद्यास  कं

हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
दादर येथे वसतिगृहात विद्यार्थाची आत्महत्या
बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

माजलगाव प्रतिनिधी – तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे (52 वर्षे) यांनी कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांचा सततच्या तगाद्यास  कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
आत्महत्या प्रकरणी समजलेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे यांना 3.5 एकर शेती असून त्यात कापसाचे पीक घेतले होते. कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस घरात पडून आहे पण माजलगाव शहरातील एका मल्टीस्टेट को-आप क्रेडीट सोसायटी कडुन घेतलेल 1लाख, 50हजार रु.कर्ज थक्कीत बाकीत निघाल्याने 31मार्च रोजी संबधीत कर्ज वसुली पथकाने कर्ज भरण्याची ताकीद देऊन त्यांचा पाण उतारा केला होता.  याच नैराश्यातुन विठ्ठल काळेंनी शनिवार 1एप्रिल रोजी भावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी चर्चा ऐकावयास मिळाली. खबरी प्रमाणे माजलगाव ग्रामीण पोस्टेचे सपोनि.विजयसिंहजोनवाल,पोउपनि.सुनिल बोडके, पो.कॉ. पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी शेतकरी विठ्ठल काळे यांच्या खिशात चिट्टी आढळली त्यात कापसाला भाव नसल्याचे व पतसंस्था व खाजगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे असे सांगितले जाते, पार्थिवाचे शवविच्छेदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करुन शव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर विठ्ठल काळेंच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

COMMENTS