Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारखान्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

आ. आशुतोष काळे ; काळे कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता  कोरपगाव :  सहकारी साखर कारखानदारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्य

युवकांनी जिम साहित्याचा फायदा घेवून शरीर सुदृढ बनवावे 
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे
धुळमुक्त कोपरगावसाठी आ. काळेंचे मोठे योगदान : त्रिभुवन

आ. आशुतोष काळे ; काळे कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता 

कोरपगाव :  सहकारी साखर कारखानदारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने पाऊल उचलले आहे. उस उत्पादक शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाची नोंद स्वतः करू शकतील. त्याचं बरोबर कारखान्याच्या वतीने मोबाईल ॲप तयार केलेले असून यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या उसाची नोंद, उसाचे टनेज, उस पेमेंट व सवलतीची साखर आदी माहिती  घरबसल्या समजणार आहे. कारखान्याच्या कामकाजात एआयचा वापर करून कामकाज अत्याधुनिक आणि सोपे कसे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४/२५ च्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व  गौरी  शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.

 पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्वर्गीय शंकरराव काळे  व स्वर्गीय शंकरराव कोल्हे  यांनी साठ सत्तर वर्ष जोपासलेली कारखानदारी सुदृढ व सक्षम रित्या चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची व प्रयत्नांची गरज आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ११३ दिवस चाललेल्या २०२५-२६ च्या गळीत हंगामात ६ लाख ६५ हजार १३६  मे.टन ऊसाचे गाळप होवून ७ लाख ५९ हजार ६७५ क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.४१ टक्के राहिला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

 याप्रसंगी संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्यु.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.

COMMENTS