Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक सोसायटीच्या कृतज्ञता सोहळ्यात गोंधळ

 निम्मे जेवण वाया, नवीन संचालक मंडळावर टीका  देवळाली प्रवरा : राहुरी येथे अहमदनगर डिस्ट्रिक्ट शिक्षक सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत पाल्य सत्कार

राहुरीत गुन्हेगारी वाढली, पोलिसांची पकड सैलच !
मजूर पाहायला आलेल्यांना राहुरीत लुटले
बिबट्यांची दहशत ! शेत संरक्षणासाठी शेतकरी झाले बंदूकधारी  

 निम्मे जेवण वाया, नवीन संचालक मंडळावर टीका 

देवळाली प्रवरा : राहुरी येथे अहमदनगर डिस्ट्रिक्ट शिक्षक सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत पाल्य सत्कार व सेवानिवृत्त शिक्षक कृतज्ञता निधी सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कार्यक्रमातील नियोजनाच्या त्रुटींमुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या जेवण व्यवस्थेतील निम्म्याहून अधिक अन्न वाया गेल्याची चर्चा रंगली आहे.

राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत शिवचिंदबर सांस्कृतिक भवन, बारागाव नांदूर रोड येथे हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने ज्येष्ठतेचा क्रम बदलल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. खऱ्या अर्थाने ज्येष्ठ असलेल्या सदस्यांनी सुरुवातीला संयम राखला, मात्र कार्यक्रमाच्या पद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली.परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून सहकार क्षेत्रातील जाणकार तसेच प्रमुख पाहुणे अरुण तनपुरे यांनी पुढील कार्यक्रमाचे कारण देत सभागृहातून काढता पाय घेतल्याचे समजते.

दरम्यान, नवीन संचालक मंडळाच्या उपक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पूर्वी असे कार्यक्रम पदाधिकाऱ्यांकडून साध्या पद्धतीने पार पडत होते व सभासदांच्या पैशांचा अपव्यय होत नव्हता, असा आरोप निवृत्त सभासद भाऊसाहेब पगारे यांनी केला. सभासदांच्या निधीतून मोठ्या प्रमाणात जेवण व्यवस्था करून ते अन्न वाया जात असेल, तर हा खर्च करण्यामागील उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांची मनमानी व बोगस कारभार असल्याची टीकाही त्यांनी केली.

या प्रकारामुळे शिक्षक सोसायटीच्या कार्यक्रम नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सभासदांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS