Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

लातूर ः माजी खासदार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या जा

सत्तेपेक्षा वेळ साधणाऱ्या शरद पवारांना शह म्हणजे शक्ती !
आघाडी सरकारच्या 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार : किरीट सोमय्यांचा इशारा
बीसीसीआयचा  ऋषभ पंतच्या कमबॅकसाठी ग्रीन सिग्नल

लातूर ः माजी खासदार, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परिवर्तनवादी विचारसरणी, अभ्यासू वृत्ती आणि सार्वजनिक जीवनातील स्वच्छ प्रतिमा यांमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
11 नोव्हेंबर 1934 रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन यांना वाहून घेतले. शिक्षक, साहित्य अभ्यासक आणि प्रशासक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचे ते संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाची उभारणी, शैक्षणिक धोरणांची आखणी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा ठरवण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. साहित्य क्षेत्रात निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी चळवळींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या लेखनात अभ्यासपूर्णता, स्पष्ट भूमिका आणि वैचारिक धार दिसून येते. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि समाजचिंतक यांच्यात त्यांना विशेष मान्यता मिळाली. शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून त्यांची ओळख विशेष अधोरेखित केली जाते. निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावली. या पद्धतीमुळे लातूरचे नाव देशभर गाजले आणि अनेक विद्यार्थ्यांना यशाची नवी दिशा मिळाली. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. शिक्षण, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम त्यांच्या आयुष्यातून दिसून आला. त्यांच्या स्मृतींना राज्यभरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

शिक्षण, राजकारण, समाजकारणाला जोडणारा दुवा निखळला ः मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, विद्वत्ता, तत्वनिष्ठता आणि लोकाभिमुखता यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी भाषा व साहित्याबरोबरच अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. वाघमारे यांनी अध्यापन आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला, असे त्यांनी नमूद केले.

COMMENTS