Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावातील १५ कोटींच्या रस्तेकामास प्रारंभ

कोपरगाव : आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून माध्यमातून सावळीविहीर-सडे-वारी आणि सवंत्सर-कान्हेगाव-वारी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मतदार संघातील असंख्य विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला आहे. या निधीतील सावळीविहीर-सडे-वारी या ५ किमी रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी तर संवत्सर-कान्हेगाव-वारी या ९ किमी रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणत आ. काळे यांनी मतदार संघातील या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. या दोन्ही रस्त्यांचे काम दर्जेदार आणि पारदर्शक पणे पूर्ण होऊन शेतकरी, दूध व्यावसायिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करून पूर्णत्वास नेला आहे. केवळ रस्ते बांधणे महत्त्वाचे नसून ते दीर्घकाळ टिकणारे आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यांच्या कामात लक्ष घालून चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे. महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचवली असल्याने नागरिक समाधानी आहे.

आमदार काळेंची कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत : सुनील बोरा
गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा : आ.काळे 
शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा

कोपरगाव : आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या निधीतून माध्यमातून सावळीविहीर-सडे-वारी आणि सवंत्सर-कान्हेगाव-वारी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून मतदार संघातील असंख्य विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवला आहे. या निधीतील सावळीविहीर-सडे-वारी या ५ किमी रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी तर संवत्सर-कान्हेगाव-वारी या ९ किमी रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणत आ. काळे यांनी मतदार संघातील या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.

या दोन्ही रस्त्यांचे काम दर्जेदार आणि पारदर्शक पणे पूर्ण होऊन शेतकरी, दूध व्यावसायिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करून पूर्णत्वास नेला आहे. केवळ रस्ते बांधणे महत्त्वाचे नसून ते दीर्घकाळ टिकणारे आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यांच्या कामात लक्ष घालून चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे. महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचवली असल्याने नागरिक समाधानी आहे.

COMMENTS