Homeताज्या बातम्यादेश

जेएनयूमध्ये डाव्यांचा अभाविपच्या विद्यार्थ्यांवर हल्ला

नवी दिल्ली ः दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी उशिरा रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. डाव्या विचा

देशातील २५ टक्के यूनिकॉर्नची महाराष्ट्रात निर्मिती : मंत्री नवाब मलिक
घर खाली करण्यासाठी मारहाण, भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली ः दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी उशिरा रात्री दोन विद्यार्थी गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा आमनेसामने संघर्ष झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांच्या कथित वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर मागील काही दिवसांपासून वातावरण तापले होते. कुलगुरूंनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समता नियमांविषयी केलेल्या कथित विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी ‘समता मोर्चा’ काढून कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. काही पदाधिकार्‍यांवर करण्यात आलेल्या निलंबनाविरोधातही आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो पुढे हिंसक स्वरूपात बदलल्याचे सांगितले जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आलेल्या निवेदनात, त्यांच्या कार्यकर्त्यांवर डाव्या गटांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून मारहाण करण्यात आली, तसेच काहींना गंभीर दुखापत झाल्याचा दावा परिषदेकडून करण्यात आला आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिषदेकडून असेही म्हटले आहे की, मागील आठवडाभर संप सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास कक्षातून बाहेर काढल्याच्या घटना घडल्या. एका विद्यार्थ्याच्या डोळ्यांत अग्निशामक यंत्रातील पूड फेकून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत इतर विद्यार्थी गटांची वेगळी भूमिका असल्याचे समजते. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नेमकी घटना कशी घडली याची चौकशी सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठ परिसरात सुरक्षिततेबाबत प्रश्‍न उपस्थित होत असून, शिक्षणाचे वातावरण अबाधित राखण्यासाठी सर्व संबंधितांनी संयम बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS