Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्या विद्यालय म्हणजे विद्यार्थिनी घडवणारे संस्कारपीठ : माजी मंत्री पाचपुते

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्था संचलित श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना, “कन्या विद्यालय म्हणजे गुणवंत विद्यार्थिनी घडवणारे चालते-फिरते संस्कारपीठ आहे,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, पोपट खेतमाळीस, तुकाराम कण्हेरकर, प्राचार्य राजेंद्र खेडकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या जयश्री दरेकर, रत्नप्रभा बोरुडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी रणसिंग,  स्नेहा पवार, ज्योती वायभासे, बापूराव औटी,  योगेश भोसले, प्रकाश मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय अतिथींच्या हस्ते इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा तसेच सहशालेय उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यालयाचे थोर देणगीदार  ज्योत्स्ना भंडारी, चंद्रकांत चौधरी, अशोक मांढरे, सचिन आनंदकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत चव्हाण यांनी केले. दुपारी विद्यालयाच्या भव्य मैदानावर “उत्सव स्वरांचा, अविष्कार कलागुणांचा” हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. श्रीगोंदा परिसरातील शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख किरण शिंदे व सचिन गारुडकर यांनी केले.

तीस वर्षांनी रंगला मित्र-मैत्रिणींचा मेळावा
पोटे यांना स्वीकृत नगरसेवक पदापासूनही रोखणार?
शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी खेंडके 

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्था संचलित श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना, “कन्या विद्यालय म्हणजे गुणवंत विद्यार्थिनी घडवणारे चालते-फिरते संस्कारपीठ आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, पोपट खेतमाळीस, तुकाराम कण्हेरकर, प्राचार्य राजेंद्र खेडकर, प्राचार्य दिलीप भुजबळ, स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या जयश्री दरेकर, रत्नप्रभा बोरुडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी रणसिंग,  स्नेहा पवार, ज्योती वायभासे, बापूराव औटी,  योगेश भोसले, प्रकाश मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्माननीय अतिथींच्या हस्ते इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा तसेच सहशालेय उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे थोर देणगीदार  ज्योत्स्ना भंडारी, चंद्रकांत चौधरी, अशोक मांढरे, सचिन आनंदकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वर्षा भोईटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत चव्हाण यांनी केले. दुपारी विद्यालयाच्या भव्य मैदानावर “उत्सव स्वरांचा, अविष्कार कलागुणांचा” हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. श्रीगोंदा परिसरातील शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख किरण शिंदे व सचिन गारुडकर यांनी केले.

COMMENTS