Homeताज्या बातम्यादेश

मंत्री शाह टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर

लखनऊ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात 2018 मधील मानहानी प्रकरणात हजर झाले. केंद्रीय गृहमंत्

सुवेंदू अधिकारी प. बंगालचे नवे मुख्यमंत्रीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब
पाकव्याप्त काश्मीरसाठी 24 जागा राखीव
अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी भररस्त्यात रुग्णवाहिकेला अडवलं

लखनऊ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात 2018 मधील मानहानी प्रकरणात हजर झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून दाखल झालेल्या या खटल्यात न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवला.
सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीत राहुल गांधी यांनी आपल्याविरुद्धचा खटला हा स्वस्त लोकप्रियतेसाठी रचलेला कट असल्याचा दावा केला. संबंधित पुरावे न्यायालयात सादर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी 9 मार्च रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वीच्या काही तारखांना ते अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने वैयक्तिक उपस्थितीचे आदेश दिले होते. कर्नाटकातील पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या संदर्भात भाजप नेते विजय मिश्रा यांनी मानहानीचा दावा दाखल केला असून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

COMMENTS