एआय परिषदेत अर्धनग्न आंदोलननवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे शुक्रवारी झालेल्या एआय समिट 2026 मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्

एआय परिषदेत अर्धनग्न आंदोलन
नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे शुक्रवारी झालेल्या एआय समिट 2026 मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. या समिटच्या दरम्यान, कार्यकर्त्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात ’मोदी इज कॉम्प्रमाईज्ड’च्या घोषणाबाजी केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या टी-शर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो छापले होते. त्यावर झच् इज कॉम्प्रमाईज्ड असे लिहून त्यांनी विरोध दर्शवला. या घोषणाबाजीचे अनेक व्हिडिओ समोर आले असून, पांढर्या टी-शर्टमध्ये 15-20 कार्यकर्त्यांचा जमाव दिसला. दिल्ली पोलिसांनी भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे, आणि आतापर्यंत चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, कार्यकर्ते भारत मंडपममध्ये कसे प्रवेशले, याचा तपास सुरू आहे, कारण या ठिकाणी प्रवेशासाठी पास किंवा क्यूआर कोड आवश्यक आहेत. दुसरीकडे, भाजपने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निदर्शनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’द’ वर काँग्रेसवर टीका केली. त्यांच्यानुसार, काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया. काँग्रेस नाही, तर अँटी नॅशनल काँग्रेस आहे. त्यांनी आरोप केला की काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली निदर्शनं केली आहेत. शहजाद पूनावाला यांनी हे ’अविचारपूर्ण आणि भावनाहीन’ निदर्शने ठरवली आहेत, ज्यामुळे ना पंतप्रधान मोदींचा विरोध केला जात आहे, ना भाजपचा, तर भारताच्या कामगिरीचा विरोध केला जात आहे.
भारत-अमेरिकेसमोर पूर्णपणे झुकला ः खा. राहुल गांधी
भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या करारामुळे भारत जास्त देत आहे आणि बदल्यात कमी मिळवत आहे, असे चित्र निर्माण होत आहे. त्यांनी या भूमिकेला अमेरिकेसमोर भारत पूर्णपणे झुकला असं म्हटले आहे. एक्सवर राहुल गांधी यांनी संसदेतील आपल्या भाषणाचा संदर्भ देत ‘जिउ-जित्सु’ या खेळाचे उदाहरण पुन्हा मांडले. या खेळात प्रतिस्पर्ध्याला पकडून किंवा दाबून नियंत्रणात ठेवले जाते, असे सांगत त्यांनी सूचित केले की राजकारणातही असेच अदृश्य दबाव कार्यरत असतात. त्यांच्या मते, या दबावांचा परिणाम म्हणून भारताने करारात काही महत्त्वाच्या बाबतीत माघार घेतली असावी. राहुल गांधी यांनी करारासंदर्भात काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत- भारतीय शेतकर्यांचे संभाव्य नुकसान का स्वीकारले गेले? अमेरिकेकडून तेल व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास सहमती का देण्यात आली? दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सची आयात वाढवण्याची अट का मान्य करण्यात आली? भारतीय नागरिकांचा डेटा परदेशी कंपन्यांसाठी खुला का केला जात आहे?असे सवाल उपस्थित केले आहेत.

COMMENTS