Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेकडो विद्यार्थ्यांनी अभ्यासला संगमनेरचा समृद्ध सहकार

 विविध महाविद्यालयांच्या 3200 विद्यार्थ्यांची सहकारी संस्थांना भेट  संगमनेर : ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करणारी सहकार चळवळ अत्यंत निकोप, शिस्तबद्ध आणि पारदर्शीपणे राबविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या माजी कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांना 3200 शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली असून देशासाठी मॉडेल ठरणाऱ्या संगमनेरचा आदर्श सहकार त्यांनी अभ्यासला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ या विविध सहकारी संस्थांना अमृतवाहिनी महाविद्यालयातील विविध विद्यार्थी 1200, श्रमिक महाविद्यालय 600, केटीएच महाविद्यालय नाशिक 200, यांच्यासह इतर 1200 संगमनेर तालुक्यातील विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.  या भेटीदरम्यान थोरात कारखान्यामधील साखरेची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. को -जनरेशन या प्लांटलाही भेट दिली. दररोज होणारी विद्युत निर्मिती तिचा वापर आणि इथेनॉल प्रकल्प या विविध प्रकल्पांना भेट देऊन कारखाना कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.  तर राजहंस दूधसंघामध्ये गावपातळीवरील दूध सोसायटी मधून आलेल्या दुधावर विविध प्रक्रिया ते पॅकिंग प्रक्रिया याचबरोबर विविध उपपदार्थांची निर्मिती,प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अभ्यासली. तर सहकारी चळवळीला बळकटी देण्याबरोबर शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांना आर्थिक मदतीतून स्थैर्य देणाऱ्या अमृतवाहिनी बँकेच्या कामकाजाची पाहणीही सर्व विद्यार्थ्यांनी केली.  कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या अशा अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योग, सहकार आणि समाज रचना यांची प्रत्यक्ष ओळख झाली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी व भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी असल्याचे श्रमिक महाविद्यालयाचे प्रा.आप्पासाहेब थिटमे यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा
आ.थोरातंकडून बस अपघातातील जखमींना तातडीने मदत
पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका

 विविध महाविद्यालयांच्या 3200 विद्यार्थ्यांची सहकारी संस्थांना भेट

 संगमनेर : ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करणारी सहकार चळवळ अत्यंत निकोप, शिस्तबद्ध आणि पारदर्शीपणे राबविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर कार्यरत असलेल्या माजी कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांना 3200 शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली असून देशासाठी मॉडेल ठरणाऱ्या संगमनेरचा आदर्श सहकार त्यांनी अभ्यासला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ या विविध सहकारी संस्थांना अमृतवाहिनी महाविद्यालयातील विविध विद्यार्थी 1200, श्रमिक महाविद्यालय 600, केटीएच महाविद्यालय नाशिक 200, यांच्यासह इतर 1200 संगमनेर तालुक्यातील विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.

 या भेटीदरम्यान थोरात कारखान्यामधील साखरेची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. को -जनरेशन या प्लांटलाही भेट दिली. दररोज होणारी विद्युत निर्मिती तिचा वापर आणि इथेनॉल प्रकल्प या विविध प्रकल्पांना भेट देऊन कारखाना कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

 तर राजहंस दूधसंघामध्ये गावपातळीवरील दूध सोसायटी मधून आलेल्या दुधावर विविध प्रक्रिया ते पॅकिंग प्रक्रिया याचबरोबर विविध उपपदार्थांची निर्मिती,प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अभ्यासली. तर सहकारी चळवळीला बळकटी देण्याबरोबर शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांना आर्थिक मदतीतून स्थैर्य देणाऱ्या अमृतवाहिनी बँकेच्या कामकाजाची पाहणीही सर्व विद्यार्थ्यांनी केली.

 कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या अशा अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच उद्योग, सहकार आणि समाज रचना यांची प्रत्यक्ष ओळख झाली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी व भविष्यातील करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी असल्याचे श्रमिक महाविद्यालयाचे प्रा.आप्पासाहेब थिटमे यांनी म्हटले आहे.

COMMENTS