Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत रुग्णालयाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचा शुभारंभ

रुग्णकेंद्रीत आरोग्य सेवेचा नवा उपक्रम नांदेड । प्रतिनिधी रयत आरोग्य मंडळ संचलित रयत रुग्णालय गेली वीस वर्षे रास्त काम-रास्त दामहे ब्रीद घेऊन सामा

कार मध्ये गाईचे वासरू कोंबून नेणारे आरोपी पकडण्यात रामतीर्थ पोलिसांना आले यश
पिंपळगाव राजवाडी येथील जय केदारनाथ आश्रम शाळेत बोगस विद्यार्थ्यांचा घोटाळा?
ठाकरे सेनेच्या प्रचार पदयात्रेने मतदारांमध्ये आत्मविश्वास

रुग्णकेंद्रीत आरोग्य सेवेचा नवा उपक्रम
नांदेड । प्रतिनिधी
रयत आरोग्य मंडळ संचलित रयत रुग्णालय गेली वीस वर्षे रास्त काम-रास्त दामहे ब्रीद घेऊन सामान्यांच्या सेवेत कार्यरत आहे. या सेवेत असलेली अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची उणीव दूर करण्यासाठी अतिदक्षता विभागाचा शुभारंभ छत्रपती संभाजी नगर येथील एम जी एम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. आनंद निकाळजे यांच्या हस्ते (दि.15 रोजी) संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वैद्यकीय चिकित्सक डॉ. डी .आर .वाघमारे हे होते.
रयत आरोग्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी प्रस्ताविकामध्ये रयत उपक्रमाच्या स्थापने मागील भूमिका विशद केली. समाजातल्या सक्षम लोकांच्या सहकार्याने भांडवली खर्च एकत्र करून दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचे धोरण यशस्वी ठरले असून रुग्णकेंद्रीत आधुनिक सेवा उपलब्ध करण्यासाठी अतिदक्षता विभागाची आवश्यकता पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. पी. जी. कल्याणकर फॅमिली ट्रस्ट, लाइफ इन्शुरन्स कंपनी तसेच जना स्मॉल फायनान्स बँकेच्या सहयोगातून ही उभारणी शक्य झाल्याबद्दल त्यांनी या संस्थांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. आनंद निकाळजे यांनी सेवाभावी आरोग्य सेवा ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविणे अवघड कामगिरी असून रयतने समाजाचा  विश्वास प्राप्त करण्यात यश मिळविल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात ही वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन केले. अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी जीडीपीच्या 6 टक्के एवढी तरतूद आवश्यक असताना केवळ 1.6 निधी उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठी गुंतवणूक आवश्यक झाल्यामुळे वैद्यकीय सेवा महाग होत असून त्या सर्वसामान्यांच्या अवाक्यात आणण्यासाठी रयतसारख्या उपक्रमांना भक्कम आर्थिक पाठिंबाद्वारे सामूहिक बळ उभारणीची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रसारामुळे वैद्यकीय सेवा प्रभावित होण्याची भीती त्यांनी निराधार ठरविली. रुग्णांचा वैद्यकीय चिकित्सकावरील भक्कम विश्वास आणि त्यांचा जिव्हाळ्याचा मानवी स्पर्श यातील नाते जोपर्यंत अतूट आहे तोपर्यंत सद्यस्थिती कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मराठवाड्यात शिक्षण घेणारे पहिले वैद्यकीय पदवीधर व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वाघमारे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना पैशाकडे न पाहता रुग्णाला बरे करणे आणि त्यामध्ये समाधान शोधणे  हाच आपला यशस्वी जीवनक्रम राहिल्यामुळे सेवेमध्ये भरपूर आनंदाचे संचित प्राप्त झाल्याचे सांगून वयाच्या 92 व्या वर्षीही रयत रुग्णालयात अत्याधुनिक ज्ञान प्राप्तीसाठी सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.  कार्यक्रमाचे  संचलन डॉ. राधा राठी यांनी केले तर रयत आरोग्य मंडळाची सचिव डॉ. एम .एस .पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. रयत आरोग्य मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त डॉ. अर्जुन मापारे, डॉ. दिगंबरराव डोंगरगावकर, डॉ. दि.भा.जोशी , डॉ  गोविंद भट्टड, डॉ. अनिल तोष्णीवाल, सुधाकरराव टाक, एम .आर. जाधव , सुधीर चिंता वार, बापूरावजी गजभारे डॉ.विठ्ठल फड, मुकुंद जवळगावकर, ज्ञानेश्वर महाजन, ए .एल. चौधरी, डी. एस.बोराळकर , यांच्यासह शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS