जयपूर : राजस्थानमधील जयपूर-कोटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. जयपूरजवळील चाक्सू परिसरात टिगरिया मोडजवळ सकाळी सुमारे
जयपूर : राजस्थानमधील जयपूर-कोटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. जयपूरजवळील चाक्सू परिसरात टिगरिया मोडजवळ सकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव कार पुढे चाललेल्या ट्रेलरवर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यामध्ये प्रवास करणार्या पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून सर्वजण मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार कार मध्य प्रदेशातून जयपूरकडे जात होती. चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुढील ट्रेलरला जोरात धडकली. अपघातानंतर कारमधील प्रवासी आतमध्येच अडकून पडले होते.
घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या एका युवकाने रुग्णालयात नेत असताना प्राण सोडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची ओळख अखिलेश श्रीवास्तव यांची पत्नी रेशमा श्रीवास्तव, राजेश राय यांचा मुलगा पियूष राय, बबलू रजक यांचा मुलगा रजक राहुल आणि चालक अनुराग अशी झाली आहे. पाचव्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

COMMENTS