पुणे : पुणे-नागपूर या लांब पल्ल्याच्या मार्गावर ‘इंटरसिटी स्मार्टबस एअर क्वालिटी इंडेक्स (हवा गुणवत्ता निर्देशांक)’ ही विशेष बससेवा सुरू करण्यात आ

पुणे : पुणे-नागपूर या लांब पल्ल्याच्या मार्गावर ‘इंटरसिटी स्मार्टबस एअर क्वालिटी इंडेक्स (हवा गुणवत्ता निर्देशांक)’ ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि नियंत्रित हवेच्या वातावरणात प्रवास करता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्रीपाद भागवत यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
दोन प्रमुख शहरांदरम्यानचा दीर्घ प्रवास अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि आरामदायी व्हावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष राठी यांनी सांगितले की, पुणे हे आंतरशहर प्रवासाचे महत्त्वाचे केंद्र असून पुणे-नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर स्वच्छ हवेची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. कंपनीच्या अंतर्गत अभ्यासानुसार, लांब पल्ल्याच्या प्रवासात बसच्या आतील हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेल्या मर्यादेपेक्षा दोन ते तीन पट अधिक असू शकते. यावर उपाय म्हणून बसमध्ये सातत्याने हवा शुद्ध करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच ‘रिअल टाइम एअर क्वालिटी इंडेक्स’ म्हणजेच प्रत्यक्ष वेळेतील हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी हवामान तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘रिस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’ या कंपनीचे सहकार्य घेतले आहे. प्रायोगिक टप्प्यातील चाचण्यांमध्ये प्रवासाच्या 90 टक्क्यांहून अधिक कालावधीत पीएम 2.5 (2.5 मायक्रॉनपेक्षा लहान सूक्ष्म कण) यांची पातळी सुमारे 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नियंत्रित ठेवण्यात यश मिळाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. प्रवासी तिकीट आरक्षण करताना मोबाईल प किंवा संकेतस्थळावर ‘स्मार्टबस एअर क्वालिटी इंडेक्स’ या चिन्हाद्वारे या विशेष बसेस ओळखू शकतात. प्रवासादरम्यान बसमधील पडद्यावर तसेच पवर हवा गुणवत्ता निर्देशांकाची अद्ययावत माहिती पाहता येणार आहे. पुढील काळात ही सुविधा इतर महत्त्वाच्या मार्गांवरही सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

COMMENTS