Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा कालावधीत कलम 163 प्रमाणे मनाई आदेश

बीड । प्रतिनिधी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा आणि दि. 20 फेब्रुवारी 2

माता रमाई यांच्या जीवनातून संघर्ष व त्यागाची प्रेरणा घ्यावी-डॉ.प्रतिभा जाधव
मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन

बीड । प्रतिनिधी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा आणि दि. 20 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. सदरील परीक्षा सुव्यवस्थीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्राच्या परिसरात जमाबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा चालू असताना बाहेरच्या लोकांकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. तसेच परिक्षा चालू असताना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करतात तसेच परिसरातील झेरॉक्स सेंटरचा कॉपी पुरविण्यासाठी दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता, परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना व परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचा-यानां बाहेरील व्यक्तींचा त्रास होऊ नये, तसेच जिल्हयात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हयातील फेब्रुवारी, मार्च 2026 मध्ये घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा केंद्राचे 100 मिटर परिसरात  परिक्षेचे साहित्य ठेवण्यात आलेल्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्य होऊ नयेत याकरिता खालील कृत्य करण्यास मनाई  भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार आहे हे आदेश परिक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही.परिक्षा केंद्राबाहेर व परिसरात परिक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी अणि परिक्षार्थी यांना वगळून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परिक्षा केंद्राचे 100 मी परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्र, फॅक्स केंद्र व ध्वनीक्षेपक ईत्यादी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदर पासून ते परीक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीपर्यंत चालू ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय आणि परिक्षेसंबंधीत कर्मचार्‍यांच्या व विद्यार्थ्यांच्या वाहनाव्यतिरीक्त इतर अनाधिकृत वाहनांना परिक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध  आहे. सदर आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत.हे आदेश बीड जिल्हयाच्या हद्दीतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात व परीक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी दि.10 फेब्रुवारी 2026 ते दि.18 मार्च 2026 या कालावधीत त्या-त्या दिवशीच्या परिक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परीक्षा पेपर संपेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहातील, असे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

COMMENTS