Homeताज्या बातम्यादेश

तान्या नाथन सी. देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

कन्नूर :केरळच्या न्यायिक इतिहासात एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा नोंदवला जाणार आहे. तान्या नाथन सी. या केरळमधील पहिल्या तर देशातील दुसर्‍या 1

पोलिस निरीक्षक संजय हारुगडे बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक
आसना नदीतील पाण्याचा अंदाज चुकला अन् दोघांचा बुडून जीव गेला
भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला, व्हिडीओ व्हायरल I LOKNews24

कन्नूर :केरळच्या न्यायिक इतिहासात एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा नोंदवला जाणार आहे. तान्या नाथन सी. या केरळमधील पहिल्या तर देशातील दुसर्‍या 100 टक्के दृष्टिहीन न्यायाधीश म्हणून लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत. न्यायिक सेवा परीक्षेत दिव्यांग उमेदवारांच्या श्रेणीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
न्यायाधीशपदाची नियुक्ती होण्यापूर्वी तान्या कन्नूर जिल्ह्यातील तालिपरम्बा येथे वकिली व्यवसाय करत होत्या. अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी हे यश संपादन करून केवळ केरळच नव्हे तर संपूर्ण देशासमोर जिद्द, कष्ट आणि आत्मविश्‍वासाचे आदर्श उदाहरण उभे केले आहे. तान्या या जन्मजात दृष्टिहीन आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण धर्मा डोम या विशेष शाळेतून घेतले. त्यानंतर पारासिनीक्कडवू उच्च माध्यमिक शाळेतून दहावी, तर मोराझा सरकारी उच्च माध्यमिक शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या पार करत त्यांनी कन्नूर विद्यापीठातील एलएलबी अभ्यासक्रमात अव्वल स्थान मिळवले. त्या काळात त्या महाविद्यालयातील एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या. तान्या नाथन यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर विश्‍वास ठेवणार्‍या आणि समावेशक न्यायव्यवस्थेची गरज अधोरेखित करणारा ठोस संदेश देणारा आहे. यापूर्वी, 2013 मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे भारतातील पहिले दृष्टिहीन न्यायाधीश ठरले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहता, सर जॉन अँथनी वॉल यांना जगातील पहिले 100 टक्के नेत्रहिन न्यायाधीश मानले जाते. युनायटेड किंगडममध्ये 1991 साली त्यांची चांसरी डिव्हिजनमध्ये उच्च न्यायालयाचे उप-मास्टर म्हणून नियुक्ती झाली होती.

COMMENTS