Homeताज्या बातम्यादेश

टीना अंबानींना ईडी पुन्हा समन्स देणार

मुंबई : मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांना पुन्

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खा.संजय काका पाटील (Video)
लढवय्या ममता दीदी !
ईडीकडून 100 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
माजी चित्रपट अभिनेत्री असलेल्या टीना अंबानी यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्या दिवशी त्या ईडीसमोर उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे आता तपास यंत्रणेकडून त्यांना नव्याने समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन परिसरात खरेदी करण्यात आलेल्या एका आलिशान कॉन्डोमिनियमशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा मागोवा (मनी ट्रेल) घेण्यासाठी ईडीकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या प्रकरणातील तपासाला गती मिळाली असून रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम)चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अलीकडेच ईडीने अटक केली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनिल धीरूभाई अंबानी समूहाविरोधातील कथित बँक फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी ईडीने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या घडामोडींमुळे अंबानी समूहाशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरील तपास अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS