Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय कुंभार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दळवी

देवळाली प्रवरा : राष्ट्रीय कुंभार महासभा, नवी दिल्ली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवी उर्फ मनोहर दळवी यांची निवड करण्यात आली. ही नियु

शिक्षक सोसायटीच्या कृतज्ञता सोहळ्यात गोंधळ
हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड

देवळाली प्रवरा : राष्ट्रीय कुंभार महासभा, नवी दिल्ली यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवी उर्फ मनोहर दळवी यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी करण्यात आली असून त्याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

 समाजसेवा, संघटनात्मक बांधिलकी तसेच प्रजापती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यभरातील कुंभार समाजाला एकत्र बांधणे, युवकांना संघटनेशी जोडणे, शिक्षण-रोजगार, सामाजिक न्याय व हक्कांसाठी प्रभावी भूमिका घेण्याची जबाबदारी दळवी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 निवडीनंतर बोलताना रवी उर्फ मनोहर दळवी यांनी, “राष्ट्रीय कुंभार महासभेने दिलेल्या या जबाबदारीचा सन्मान राखून समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. महाराष्ट्रातील कुंभार समाजाचे प्रश्न संघटितपणे मांडण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या निवडीबद्दल राज्यातील विविध भागांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

 अभंग साहित्यामुळे मराठीच्या भवितव्याची चिंता नाही : डॉ. शिंदे

अकोले : ‘विश्वमाउली संत ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या चिरंतन अजरामर अक्षर वाङ्मयाने मायमाउली मराठी भाषेच्या पदरात भरभरुन आत्मिक ज्ञानाचे धन अभंग साहित्याच्या रुपात टाकले असल्याने मराठीच्या भवितव्याची चिंता नाही’, असे प्रतिपादन साहित्यिक – संशोधक डॉ.सुनील शिंदे यांनी केले. राजूर येथील ऍड. मनोहरराव देशमुख कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख होते.

संत साहित्यासह मराठीतील मास्टर पीस ठरलेल्या कलाकृती आणि साहित्यकारांच्या साहित्याचा साधार पुरावा, लेखाजोखा मांडताना डॉ.शिंदे पुढे म्हणाले, ‘संत ज्ञानदेव, तुकाराम आणि नामदेव महाराज यांच्या अभंगातील गोडवा चिरंतन झरा आहे. निसर्ग कन्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी, संत मुक्ताई यांचे अक्षरलेणे मार्गदर्शक आहे. अकोले तालुक्यातील मातीत ज्यांची अक्षराई बहरली आणि साहित्यिक  कर्मकहाणी उजळली ते दया पवार, प्रादेशिक तसेच ऐतिहासिक कादंबरीकार गो.नी. दांडेकर, ठोकळ यांच्यासारख्या विख्यात लेखकांनी अप्रतिम साहित्य कृती मराठीला दिल्यात.

मराठीतील सकसता नजरेस आणताना प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगतात आदिवासी, ग्रामीण बोलीचा अस्सलपणा तसेच शाहिरी रचनांतील डौलदारपणा आणि वामनदादा कर्डक यांच्या साहित्यातील आधार स्पष्ट केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब ननावरे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ. द. के. गंधारे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

COMMENTS