Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन !

मुंबई प्रतिनिधी - प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर

एकापाठोपाठ 3 मुलींनी घेतली धावत्या ट्रेनमधून उडी | LOK News 24
मतांचे बेगमी राजकारण
मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा

मुंबई प्रतिनिधी – प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात. आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे. नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.

COMMENTS