Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची प्रेरणादायी जीवनगाथा

सुखासीनतेचा त्याग आणि जनसेवेचा ध्यासकेज । प्रतिनिधीआयुष्य म्हणजे काय? सामान्यतः लोक त्याचा अर्थ पैसा, उत्तम आरोग्य, सुखी कुटुंब आणि मित्रमंडळींच्य

जनसामान्यांच्या समस्यांना ‘काकाजी’ मुंदडांचा पाठिंबा
अंबाजोगाईकरांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट!
अंबाजोगाईत कंत्राटी कामगारांचा वेतनवाटप

सुखासीनतेचा त्याग आणि जनसेवेचा ध्यास
केज । प्रतिनिधी
आयुष्य म्हणजे काय? सामान्यतः लोक त्याचा अर्थ पैसा, उत्तम आरोग्य, सुखी कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सहवासात शोधतात. मात्र, अंबाजोगाईच्या मातीतील एक व्यक्तिमत्व या सामान्य व्याख्येपेक्षा वेगळं ठरलं आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा (काकाजी) हे लोक, समाज आणि जनसेवेसाठी समर्पित अशी व्यक्तिमत्वाची जिवंत उदाहरणे आहेत. स्वतःच्या आरोग्य आणि आनंदाला तिलांजली देत, त्यांनी नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समाधान पेरण्यासाठी रात्रंदिवस झटणं स्वीकारलं आहे.
एकेकाळी काकाजींचं आयुष्य सुखसंपन्न होतं. व्यवसायात यशस्वी, व्यायामाची आवड, पर्यटन आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची हौस – सर्व काही सुरळीत आणि आनंददायी सुरू होतं. पण अंबाजोगाई-केज मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या पाहून, आणि त्यांच्या डोळ्यातील पाण्याचे दर्शन होताच, काकाजी संवेदनशील झाले. मी समाजासाठी काय करतोय? या प्रश्नाने त्यांचे स्वप्नवत आयुष्य संघर्षाच्या मार्गावर वळवले. जनसेवेचा मार्ग स्वीकारताना काकाजींनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले. शरीराच्या वेदनांसाठी अनेकदा ’पेनकिलर्स’ आणि ’स्टिरॉइड्स’चा आधार घ्यावा लागतो; तरीही लोकांच्या समोर त्यांचा चेहरा नेहमीच हास्याने उजळतो. काकाजींना शारीरिक त्रास असला तरी, नागरिकांच्या समस्या सोडवल्यानंतर दिसणारा समाधानाचा भाव त्यांच्या जीवनातील सर्वात मोठं औषध ठरतो. लोकांच्या आशीर्वादाची ताकद त्यांना नवी ऊर्जा देते आणि त्या शक्तीनेच ते रात्रंदिवस काम करत राहतात. दुसर्‍यांच्या दुःखाला दूर करून स्वतःचा सुख मानणारा लोकप्रतिनिधी आजच्या काळात दुर्मिळच आहे. काकाजींचा प्रवास फक्त नगराध्यक्षाचा नाही, तर एक ऋषितुल्य त्यागाचा प्रवास आहे. अंबाजोगाईच्या मातीशी असलेला ऋणानुबंध आणि जनतेसाठी केलेला समर्पण आज नव्या स्वरूपात समाजासमोर येतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि समर्पण प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे लोकसेवेच्या आदर्शाचे प्रतीक आहेत. स्वतःच्या सुखाचा त्याग करून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारा काकाजींचा प्रवास समाजातील प्रत्येक व्यक्तीस प्रेरणा देतो.

COMMENTS