गेवराई । प्रतिनिधीतालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा तर

गेवराई । प्रतिनिधी
तालुक्यातील कृषी पंडित भागूजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा तर इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य थिटे ए.एस. हे होते.
शुक्रवार दि. 6 रोजी कृषी पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. राम महाराज वराट, पाडळसिंगी चे सरपंच रितेश साबळे, उपसरपंच विकास चौधरी, बळीराम नन्नवरे, बळीराम साबळे, लक्ष्मण दाभाडे, बाबासाहेब दाभाडे, रामराव मोहोळकर, दीपक लाटे, विनायक नन्नवरे, राहुल गिरी, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना व्याख्याते राहुल गिरी म्हणाले की, उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी ही संधी आहे. या बाबीचे महत्त्व शिक्षक सांगतात ते तुम्हाला कळणे गरजेचे आहे. संधी ही चोर पावलांनी येते आणि जाताना ती वाजत- गाजत जाते असे सांगून विद्यार्थ्यांनी करिअर साठी योग्य क्षेत्र निवडावे असे सांगितले. याशिवाय सिद्धी गव्हाणे, सारिका जाधव, प्रणिता दामोधर, प्रा. अरुण कळाशे, अजिनाथ घुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य थिटे सरांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पर्यवेक्षक राजेंद्र रांजवण, राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम जाधव यांनी केले शेवटी चंद्रशेखर जामकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

COMMENTS