Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यात अपघातानंतर दुचाकी नेली फरपटत

कर्जत : अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील कोकणगाव शिवारात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले
अपघातात सात भाविकांचा मृत्यू
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात .

कर्जत : अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील कोकणगाव शिवारात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघातानंतर चारचाकी वाहनाच्या चालकाने वाहन न थांबवता दुचाकी बराच अंतर फरपटत नेल्याचा अमानुष प्रकार गुरुवारी (दि.6) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
या घटनेचा व्हिडिओ राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रीत केला. तो व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगरच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीला भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. मात्र अपघात झाल्यानंतरही संबंधित चालकाने वाहन थांबवले नाही. दुचाकी अडकलेल्या अवस्थेतच चारचाकी वाहन काही अंतर पुढे गेल्याने रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष या प्रकाराकडे गेले. नागरिकांनी तत्काळ चारचाकी अडवून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने मिरजगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकावर सध्या अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल न केल्यामुळे शुक्रवार (दि. 7) रात्री नऊ वाजेपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. मात्र समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS