Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवनात प्रगतीसाठी व्यावहारिक ज्ञानाची गरज : कवाद

निघोज : सोमवारी (दि. २) न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालआनंद मेळावा भरवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे. पुढील आयुष्यात या ज्ञानाचा उपयोग करून आर्थिक प्रगती साधावी असे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचे सेक्रेटरी  वसंत कवाद यांनी केले. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पठारवाडी येथे बाल आनंद मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष शांताराम कळसकर म्हणाले की जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी दररोजच्या जमाखर्चाचा मेळ घालण्याची शिकवण मुलांना याच वयात मिळाली पाहिजे या उद्देशानेच या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तिसरी ते नववी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत चांगले व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली, भाजीपाला, फळ विक्री तसेच विविध खेळांच्या माध्यमातून सुमारे ९९१०३ रुपयांची विक्रमी उलाढाल केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विक्री कौशल्याच्या जोरावर चांगली कमाई केली.  यावेळी बाबासाहेब कवाद  पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, वैशाली कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, शाळेचे विश्वस्त रामदास वरखडे, निघोज परिसरचे संचालक भाऊसाहेब रसाळ, पत्रकार सुरेश खोसे,  व्यवस्थापिका संगिता कवाद, प्राचार्य डायस, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टँक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात
महाविकास आघाडी संघर्षात; तर, वंचित अस्तित्वाच्या लढ्यात !
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात

निघोज : सोमवारी (दि. २) न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालआनंद मेळावा भरवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे. पुढील आयुष्यात या ज्ञानाचा उपयोग करून आर्थिक प्रगती साधावी असे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचे सेक्रेटरी  वसंत कवाद यांनी केले. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल पठारवाडी येथे बाल आनंद मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात होते.

यावेळी शाळेचे अध्यक्ष शांताराम कळसकर म्हणाले की जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी दररोजच्या जमाखर्चाचा मेळ घालण्याची शिकवण मुलांना याच वयात मिळाली पाहिजे या उद्देशानेच या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तिसरी ते नववी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवत चांगले व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले.

विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली, भाजीपाला, फळ विक्री तसेच विविध खेळांच्या माध्यमातून सुमारे ९९१०३ रुपयांची विक्रमी उलाढाल केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विक्री कौशल्याच्या जोरावर चांगली कमाई केली.  यावेळी बाबासाहेब कवाद  पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, वैशाली कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, शाळेचे विश्वस्त रामदास वरखडे, निघोज परिसरचे संचालक भाऊसाहेब रसाळ, पत्रकार सुरेश खोसे,  व्यवस्थापिका संगिता कवाद, प्राचार्य डायस, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS