Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये सीआरपीएफ व कर्जत पोलिसांचा संयुक्त रूट मार्च

कर्जत : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या उद्देशाने सीआरपीएफ / शीघ्र कृती दल व कर्जत पोल

कुकडी कालव्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
कर्जत तालुक्यात डिजिटल शाळा संकल्पनेला बळ
उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कर्जत : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या उद्देशाने सीआरपीएफ / शीघ्र कृती दल व कर्जत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये सीआरपीएफ / आरएएफचे एसीपी विशाल बिन्नर, त्यांच्यासह इतर दोन वरिष्ठ अधिकारी व ३७ जवान, तसेच कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सकाळी १०.०० ते ११.०० वाजेदरम्यान हा रूट मार्च कर्जत शहरात पार पडला.

रूट मार्चची सुरुवात कर्जत पोलीस स्टेशन येथून झाली. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, म्हसोबा गेट, कापरेवाडी वेस, आलमगीर मशीद, काकडे हॉस्पिटल, बाजार तळ, स्टार वॉच, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड आदी ठिकाणांवरून मार्गक्रमण करत पुन्हा कर्जत पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

या दरम्यान शहरातील संवेदनशील परिसर, शाळा, महाविद्यालये तसेच कर्जत शहराची भौगोलिक परिस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या बाबींचा आढावा घेणे, हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.

पोलिस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. पत्रकारांना याबाबत एसीपी विशाल बिन्नर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी या रूट मार्च बद्दल माहिती दिली.

COMMENTS