Homeताज्या बातम्याक्रीडा

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूचे सुवर्णयश

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती व भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गट

मुंबई इंडियन्सचा विजय ; पंजाबच्या अडचणी वाढल्या
नजरुद्दीन नायकवडी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघास विजेतेपद

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती व भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत तिने सुवर्णपदकासह तीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवले.
चानूने स्नॅच प्रकारात 89 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत एकूण 205 किलोचा यशस्वी प्रयत्न केला. या कामगिरीमुळे स्नॅच, क्लीन अँड जर्क तसेच एकूण वजन या तिन्ही प्रकारांमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाले. 2020 मधील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 49 किलो वजनी गटात केलेला 88 किलोचा स्नॅच हा तिचा आतापर्यंतचा सर्वोत्तम वैयक्तिक विक्रम होता. यावेळी तिने तो विक्रम मोडीत काढला. गेल्या काही वर्षांपासून 90 किलो स्नॅचचा टप्पा गाठण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील आहे. या स्पर्धेत शेवटच्या प्रयत्नात 91 किलो उचलण्याचा प्रयत्न तिने केला; मात्र तोल सांभाळता न आल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. क्लीन अँड जर्क प्रकारात चानूने 112 व 116 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. मात्र अखेरच्या प्रयत्नात 120 किलो उचलण्यात तिला अपयश आले. उल्लेखनीय म्हणजे, 2021 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने 119 किलो वजन उचलत क्लीन अँड जर्कमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना मीराबाई चानू म्हणाली, मी खूप आनंदी आहे. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्‍वास अधिक बळकट झाला आहे. यापूर्वी मी 49 किलो वजनी गटात स्पर्धा करत होते; मात्र 48 किलो गटात अशी कामगिरी करणे हे मोठे यश आहे. आज 90 किलो स्नॅचचा प्रयत्न केला, पण पुरेसे प्रशिक्षण न झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. नियमित व पूर्ण क्षमतेने प्रशिक्षण सुरू झाले की, हा टप्पा नक्कीच पार करेन. राष्ट्रीय स्पर्धेतील हे यश आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मीराबाई चानूच्या तयारीला नवी दिशा देणारे ठरणार आहे.

COMMENTS