तामसा । प्रतिनिधी तामसा येथील पीएमसी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमधील हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 28) घडली.
तामसा । प्रतिनिधी
तामसा येथील पीएमसी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमधील हाणामारीत दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 28) घडली.
नववीत शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून आशीर्वाद शेटे व विवेक खोकले हे दोन विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बाहेर पडत असताना सहा ते सात विद्यार्थ्यांसह काही शाळाबाह्य मित्रांनी त्यांच्यावर अज्ञात साधनाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. ही हाणामारी तामसा पोलीस ठाणे परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर दोन ते तीन ठिकाणी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. जखमी विद्यार्थ्यांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सिद्धार्थ पोहरे यांनी प्रथमोपचार केले. घटनेनंतर तामसा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या काही विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून पोलीस ठाण्यात ठेवले. चालू महिन्यात शालेय विद्यार्थ्यांचे पोलीस ठाण्यात जाणारे हे चौथे प्रकरण असल्याची चर्चा आहे. पोलीस ठाण्याच्या समोरच शाळा असूनही विद्यार्थ्यांमधील वाद, गटतट व नाबालिकांचे बेफिकीर वर्तन वाढत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी शालेय प्रशासन कोणती ठोस भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS