Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा ‘मूकनायक पुरस्कार’ जाहीर

31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी होणार गौरव सोहळाबीड । प्रतिनिधीसेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महारा

शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी केंद्र सुरू
Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा
जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम

31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी होणार गौरव सोहळा
बीड । प्रतिनिधी
सेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्यावतीने दिला जाणारा ‘मूकनायक 2026’ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित मूकनायक दिन समारंभात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी दिली.
बीड येथील ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांनी जनहितार्थ सातत्याने केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा गौरव सोहळा तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर, डीपी रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे हे असणार असून, अनेक मान्यवर संपादक, पत्रकार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. भारत रत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, दलित व वंचित घटकांचा आवाज म्हणून सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पहिल्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्यास आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी, समाजसेवेची जाणीव असलेले नागरिक तसेच महिला-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS