Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज : प्रा.माने

बेलापूर : ग्रामीण स्त्रियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये कौटुंबिक दडपण, शारीरिक व मानसिक आरोग्य, पुरुषाचे व्यसन, आर्थिक परावलंबन, शिक्षणाचा अभाव व सामाजिक रूढींचा ओघ या यामुळे स्त्रियांच्या जाणिवा बोथट होतात व विकासाचा दर मंदावतो. स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज असल्याचे विचार प्रा.डॉ. अशोक माने यांनी व्यक्त केले.  येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित निर्भय कन्या कार्यशाळे अंतर्गत ‘महिलांची परिस्थितीजन्य निर्णय क्षमता’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो.डॉ.गुंफा कोकाटे हे होते. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय नवाळे, प्रा.रूपाली उंडे, प्रा.प्रकाश देशपांडे, प्रा.डॉ.विठ्ठल सदाफुले, प्रा.अमृता गायकवाड, डॉ.सुनीता पठारे, प्रा. ओंकार मुळे आदी उपस्थित होते.  ते पुढे म्हणाले की पुरुषप्रधान संस्कृती, हुंडा पद्धत व हिंसाचार, व्यसनाधीनता, अपत्य न होणे, लिंगभेद, आरोग्य कडे दुर्लक्ष पोषण व अशक्तपणा, आर्थिक परावलंबन, मालमत्तेचे अधिकार  या कारणामुळे स्त्रियांच्या जाणिवा गोठतात, त्यामुळे स्त्रियांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तिसरे सत्र प्रशिक्षक अकबर शेख यांनी स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षणात सेलडिफेन्स, अटॅक ब्लँक, पंच आणि किक, लाठीकाठी, तलवारबाजी आदी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनीकडून करून घेतली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रोफेसर डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की स्त्रियांनी विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणे व पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने येणे ही खरी काळाची गरज आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनीता पठारे यांनी केले तर प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.

पश्‍चिमेकडील पाणी गोदावरीत वळवून तूट भरून काढणार
बेलापूर विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कुऱ्हे 
खेड्यांच्या विकासातून राष्ट्राची बांधणी होते : सरपंच भोसले

बेलापूर : ग्रामीण स्त्रियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये कौटुंबिक दडपण, शारीरिक व मानसिक आरोग्य, पुरुषाचे व्यसन, आर्थिक परावलंबन, शिक्षणाचा अभाव व सामाजिक रूढींचा ओघ या यामुळे स्त्रियांच्या जाणिवा बोथट होतात व विकासाचा दर मंदावतो. स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज असल्याचे विचार प्रा.डॉ. अशोक माने यांनी व्यक्त केले. 

येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित निर्भय कन्या कार्यशाळे अंतर्गत ‘महिलांची परिस्थितीजन्य निर्णय क्षमता’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो.डॉ.गुंफा कोकाटे हे होते. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय नवाळे, प्रा.रूपाली उंडे, प्रा.प्रकाश देशपांडे, प्रा.डॉ.विठ्ठल सदाफुले, प्रा.अमृता गायकवाड, डॉ.सुनीता पठारे, प्रा. ओंकार मुळे आदी उपस्थित होते.

 ते पुढे म्हणाले की पुरुषप्रधान संस्कृती, हुंडा पद्धत व हिंसाचार, व्यसनाधीनता, अपत्य न होणे, लिंगभेद, आरोग्य कडे दुर्लक्ष पोषण व अशक्तपणा, आर्थिक परावलंबन, मालमत्तेचे अधिकार  या कारणामुळे स्त्रियांच्या जाणिवा गोठतात, त्यामुळे स्त्रियांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तिसरे सत्र प्रशिक्षक अकबर शेख यांनी स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षणात सेलडिफेन्स, अटॅक ब्लँक, पंच आणि किक, लाठीकाठी, तलवारबाजी आदी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनीकडून करून घेतली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रोफेसर डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की स्त्रियांनी विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणे व पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने येणे ही खरी काळाची गरज आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनीता पठारे यांनी केले तर प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.

COMMENTS