राहाता : तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेचे तीव्र पडसाद लोणी खुर्द गावातही उमटले. या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द गाव बंद ठेवून ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावातील विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे म्हणाल्या, “महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ आज आपल्यातून निघून गेला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “अजित पवार हे पुरोगामी विचारांचे नेतृत्व होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांवर विश्वास ठेवून त्यांनी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने कार्य केले. त्यांचे नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील.” कार्यक्रमादरम्यान युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, जनतेचा नेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात स्पष्टपणे दिसून येत होती.

राहाता : तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेचे तीव्र पडसाद लोणी खुर्द गावातही उमटले. या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द गाव बंद ठेवून ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावातील विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे म्हणाल्या, “महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ आज आपल्यातून निघून गेला आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “अजित पवार हे पुरोगामी विचारांचे नेतृत्व होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांवर विश्वास ठेवून त्यांनी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने कार्य केले. त्यांचे नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील.”
कार्यक्रमादरम्यान युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, जनतेचा नेता गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात स्पष्टपणे दिसून येत होती.

COMMENTS