Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राची फार मोठी हानी : डॉ.पिपाडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी 2003 साली निळवंडे कालव्याची दुष्काळी परिषद आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला काही नेत्यां

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
राज्यकर्त्यांचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप नको

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी 2003 साली निळवंडे कालव्याची दुष्काळी परिषद आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला काही नेत्यांचा विरोध असतानाही सकाळी 8.30 वाजताच अजित पवार आले. डॉ.राजेंद्र पिपाडा यांना दिलेला शब्द पाळला व दुष्काळी परिषद व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या कार्यकाळातील राहाता नगरपालिकेचे विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांनी केले होते. अत्यंत दिलखुलास,परखड,प्रशासनावर पकड असलेले व स्वच्छता व निटनेटकेपणा तसेच कुठल्याही कामाचे उद्घाटन करताना ते काम योग्य झाले की नाही याचे निरिक्षण करुन कुठलीही त्रुटी असेल तर ते स्पष्टपणे मांडायचे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली अशी प्रतिक्रिया डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

COMMENTS