Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंगेवाडी शाळेत ‘आनंद बाजार’ उत्साहात 

शेवगाव  : पिंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा ठरलेला ‘आनंद

राज ठाकरे यांच्या पक्षाला १८ वर्ष पुर्ण होऊन देखील उध्दव ठाकरे यांच्यावर बोलतात – संजय राऊत 
मुंबईतील मावा-मिठाई विकणार्‍या आस्थापनांची होणार तपासणी
भयंकर कृत्य ! पोलिसांच्या समोर पत्नीच्या तोंडात टाकले विष.

शेवगाव  : पिंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा ठरलेला ‘आनंद बाजार’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ८ वाजल्यापासून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर दप्तरांऐवजी भाजीपाला व विविध खाद्यपदार्थांचे डबे दिसत होते.

शाळेच्या आवारात बाजारासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. एका बाजूला भाजीपाला तर लगतच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. पालकांनीही आपल्या पाल्यांना दुकान मांडण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांची लगबग आणि खरेदीसाठी आलेल्या ग्रामस्थांची गर्दी पाहण्यासारखी होती.

बाजारात मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या, कांदा, लसूण, वाटाणा यांसह इडली-सांबार, समोसा, पोहे, भेळ, पाणीपुरी, गुलाबजामून, चकली, सोयाबीन चिली, अननस, कुरमुरे आदी पदार्थ उपलब्ध होते. दही-धपाटे या पदार्थाने विशेष लक्ष वेधले.

सकाळी ९.३० वाजता पिंगेवाडी गावच्या सरपंच फरिदा चांद शेख यांच्या हस्ते फीत कापून तसेच ह.भ.प. अनिल मुंढे महाराज व किरण वाघ यांच्या हस्ते नारळ वाढवून आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकरा वाजता शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांनी बाजाराला भेट देऊन प्रत्येक दुकानातून खरेदी करत विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक कौशल्यांची परीक्षा घेतली. ११.४५ वाजता बाजाराची सांगता झाली. या उपक्रमात सर्व वस्तूंची विक्री होऊन सुमारे १५ हजार रुपयांची उलाढाल झाली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन व संचालक मंडळ, ग्रामसेवक व कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

COMMENTS