Homeताज्या बातम्याविदेश

बांगलादेशात हिंदू तरुणाची पुन्हा हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आणखी एका हिंदू तरुणाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाल्याची घटना स

बांगलादेशातील सत्तांतर आणि भारतासाठी नवे समीकरण
भारतीय तटरक्षक दलाकडून 24 बांगलादेशी मच्छिमारांना अटक
बांग्लादेशचा अमेरिकेसोबत ‘गुप्त’ व्यापार करार?

ढाका : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आणखी एका हिंदू तरुणाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नरसिंहदी परिसरात राहणार्‍या चंचल चंद्र भौमिक या तरुणाला अज्ञात व्यक्तींनी जिवंत जाळून ठार केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंचल चंद्र भौमिक हा नरसिंहदी येथे एका खासगी गॅरेजमध्ये काम करत होता आणि त्याच ठिकाणी वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री काम आटोपल्यानंतर तो गॅरेजमध्येच झोपला असताना अज्ञात व्यक्तींनी तेथे पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत चंचल गंभीर भाजला आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. बांगलादेशातील ज्येष्ठ पत्रकार सलाहउद्दीन शोएब चौधरी यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावरून उघडकीस आणली. त्यांनी नमूद केले की, ही घटना काही महिन्यांतील तिसरी अशी हत्या असून, याआधी मेमेंसिंह येथे दीपू चंद्र दास आणि शरियातपूर येथे खोकन चंद्र दास यांचीही हत्या झाली होती. या मालिकेमुळे अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे. चंचल हा मूळचा कोमिला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याची आई आजारी असून एक भाऊ अपंग आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो नरसिंहदी येथे रुबेल मियाँ यांच्या गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये एका संशयित व्यक्तीने गॅरेजमध्ये ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे आग लावल्यानंतरही आरोपी काही काळ घटनास्थळी थांबून राहिला आणि मृत्यूची खात्री झाल्यानंतरच तेथून निघून गेल्याचे फुटेजमध्ये आढळले आहे. चंचलच्या कुटुंबीयांनी ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला असून, काही स्थानिकांनी या घटनेमागे धार्मिक द्वेषाचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील हिंदू संघटना आणि नागरी समाजाने तीव्र निषेध नोंदवला आहे. अल्पसंख्याक समुदायाला पुरेसे संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत अल्पसंख्याकांवर होणार्‍या हल्ल्यांत लक्षणीय वाढ झाली असून, विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र आहे.

COMMENTS