Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प.मध्येही भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न

सिंधुदुर्गमध्ये दोन उमेदवार बिनविरोध27 जानेवारीला स्पष्ट होणार संपूर्ण चित्रमुंबई ः महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवड

मुंबई महापालिकेत भाजपाच असल्याची चिन्हे!
मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी… ‘या’ पक्षात केला प्रवेश
भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

सिंधुदुर्गमध्ये दोन उमेदवार बिनविरोध
27 जानेवारीला स्पष्ट होणार संपूर्ण चित्र
मुंबई ः महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही भारतीय जनता पक्षाने बिनविरोध निवडीचा फॉर्म्युला यशस्वीपणे अमलात आणल्याचे चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे दोन उमेदवार निवडणूक प्रक्रियेआधीच बिनविरोध निवडून आले असून, त्यामुळे पक्षाने निवडणुकीपूर्वीच विजयाचे खाते उघडले आहे.
महायुती सत्ताधारी असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने आधीच विरोधकांकडून टीकेचा सूर होता. बिनविरोध निवडींमुळे लोकशाही प्रक्रियेवर मर्यादा येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अशा पार्श्‍वभूमीवर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही तोच पॅटर्न दिसून येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. खारेपाटण जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड शक्य झाली. तर बांदा गटात भाजपचे उमेदवार व माजी सभापती प्रमोद कामत यांचा मार्गही मोकळा झाला. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी माघार घेतल्याने कामत यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्हाभरातील राजकीय समीकरणांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्याने भाजपची संघटनात्मक ताकद आणि विरोधकांची मर्यादित तयारी याबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

बिनविरोधचा अंतिम आकडा 27 जानेवारीलाच कळणार
महानगरपालिका निवडणुकीत महायुतीसह घटक पक्षाने तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले होते. त्यानंतर आत्ता जिल्हा परिषदेमध्येही तोच कित्ता गिरवणार का? अशी चर्चा सुरू असतांनाच दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटीच मुदत 27 जानेवारीची आहे. त्यामुळे त्याच दिवशी या निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत भाजप प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून या निवडणुकीतही सर्रासपणे बिनविरोध पॅटर्न राबवताना दिसून येत आहे.

COMMENTS