Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताजनापूर लिफ्ट योजनेतील जललढा तीव्र

शिष्टमंडळ पाटबंधारे मंत्र्यांना भेटणार ; १३ गावांचे भवितव्य टांगणीला शेवगाव : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक ०१ अंतर्गत वरूर–आखेगावसह १३ गावांचे बंध

दिव्यांग सेस निधी गैरवापराची चौकशी करा
कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत
पोलीस उपायुक्त कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार

शिष्टमंडळ पाटबंधारे मंत्र्यांना भेटणार ; १३ गावांचे भवितव्य टांगणीला

शेवगाव : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक ०१ अंतर्गत वरूर–आखेगावसह १३ गावांचे बंधारे, शेततळे व गावतलाव भरून मिळावेत, यासाठी लवकरच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची १३ गावांतील नागरिकांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी दिली.

 दि. १९ रोजी वरुर-आखेगावसह १३ गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक शेवगाव येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक सकाहारी भापकर होते. कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. शिवाजीराव काकडे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी बोलताना काकडे म्हणाल्या की, २०१९ पासून या योजनेतून १३ गावांतील बंधारे, गावतलाव व शेततळे भरून मिळावेत यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. या प्रयत्नांतून शासनाकडून योजना मंजूर करून घेण्यात यश आले आहे. आता प्रत्यक्ष कामाला गती मिळावी व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाटबंधारे मंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी गावांना न्याय मिळून जमिनी बागायती होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काही काळ थांबलो होतो; मात्र गावकऱ्यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकत्र येत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने हा लढा यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ऍड. शिवाजीराव काकडे, लहू जायभाये, ज्ञानदेव वीर, मारुती ढाकणे, भाऊसाहेब सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गवळी यांनी केले, तर कृष्णा ब्राह्मणे यांनी आभार मानले.

COMMENTS