Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण

कोपरगाव :   कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेली रस्त्यांची कामे मुजोर ठेकेद

हर्षा पाटील ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित  
ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पाच कोटी : आ. काळे
के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात

कोपरगाव :   कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेली रस्त्यांची कामे मुजोर ठेकेदारांमुळे ठप्प पडलेली होती. मात्र, आमदार आशुतोष काळे यांच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे अखेर कामांना गती मिळाली असून, कोपरगाव मतदारसंघात आशादायक चित्र दिसू लागले आहे.

 प्रमुख घडामोडींच्या यादीत सडे गाव ते सडे फाटा या एक कि.मी. रस्त्याचे खराब झालेले काम पुन्हा डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

 ग्रामीण भागात रस्ते हे विकासाचा कणा मानले जातात. दळणवळणाची सोय सुधारली की शिक्षण, आरोग्य, शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ होते. या दृष्टीने आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील विकासासाठी शासनाच्या विविध योजनांतून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

 अनेक रस्त्यांचे कामांचे भूमिपूजन झाले असतानाही, मुदत संपली तरीही कामे सुरू झाली नव्हती आणि काही रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत होती. या परिस्थितीला कंटाळून आ. आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि. १३) रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची बैठक घेऊन तीव्रपणे चर्चा केली.

 या बैठकीत ठेकेदारांना कामांच्या उशिराबद्दल गंभीर खंत व्यक्त करून, विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा मांडण्याचा इशारा देण्यात आला. तसेच, मुजोर व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.

 आमदारांच्या या कठोर भूमिकेचा परिणाम लगेच दिसू लागला. खराब रस्त्यांच्या कामांना गती मिळाली आणि सडे गाव ते सडे फाटा रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. पुढील आठवड्यात वारी–कान्हेगाव रस्त्याचे काम सुरू होण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. 

COMMENTS