Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोटमध्ये विजयी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

पराभवाच्या संतापातून हिंसाचार; पोलिसांचा सौम्य लाठीचार्जअकोला ः मनपा निवडणुकीतील पराभवाच्या रागातून अकोट फैल परिसरात राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना

पाथर्डी पोलिसांची कामगिरी;  २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
हॉर्न वाजवल्याने मारहाण ; ६ जणांवर गुन्हा 
एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने वार ;  गंभीर जखमी; जखेडमधील घटना

पराभवाच्या संतापातून हिंसाचार; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
अकोला ः मनपा निवडणुकीतील पराभवाच्या रागातून अकोट फैल परिसरात राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना घडली आहे. भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद श्रीराम तुरकर यांच्यावर शुक्रवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास प्राणघातक चाकूहल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तोडफोड झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक 2 ‘ब’ मधून भाजपकडून विजयी ठरलेले शरद तुरकर यांच्यावर भाजपच्याच प्रभाग क्रमांक 2 ‘ड’ मधील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. निवडणूक निकालानंतर उसळलेल्या राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रभागात एकूण चार जागांपैकी तीन जागा एआयएमआयएमने जिंकल्या असून एका जागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 2 ‘ब’ मध्ये शरद तुरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर सुमारे 2,200 मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानिमित्ताने अकोट फैल भागातून विजयी रॅली काढण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सत्कारासाठी जात असताना शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि वाद विकोपाला गेला. यावेळी वाहनांची तसेच दुकानांची तोडफोड झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला. हल्ल्यात जखमी झालेले शरद तुरकर यांना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

COMMENTS