अशोक चव्हाणांच्या ध्रुवीकरणाच्या खेळीचा काँग्रेसला मोठा फटकानांदेड ः नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बसलेला पराभव केवळ राजकीय नसून परंपरा

अशोक चव्हाणांच्या ध्रुवीकरणाच्या खेळीचा काँग्रेसला मोठा फटका
नांदेड ः नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बसलेला पराभव केवळ राजकीय नसून परंपरागत मुस्लिम जनाधार हातातून निसटल्याचा तो स्पष्ट संकेत मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा मुस्लिम मतांचा मोठा हिस्सा एम.आय.एम.ने बळकावल्याचे चित्र समोर आले असून, त्यामुळे काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे.
मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण निर्णायक
मागील दोन लोकसभा निवडणुकांत नांदेडमधून काँग्रेसला प्रचंड मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी हे मताधिक्य तुटण्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतध्रुवीकरणाच्या खेळीचा मोठा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. भाजपकडे गेलेल्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग विभागण्यात यश मिळवले, असे निरीक्षकांचे मत आहे.
काँग्रेसला ऐतिहासिक फटका
या ध्रुवीकरणाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. गत महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 73 जागा मिळवणारी काँग्रेस यावेळी अवघ्या 10 जागांवर आटोपली, हा नांदेडच्या राजकारणातील मोठा उलथापालथ करणारा निकाल ठरला आहे. संघटनात्मक कमजोरी, नेतृत्वाचा अभाव आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा फटका काँग्रेसला सहन करावा लागला.
एमआयएमचा उदय, काँग्रेसची पिछेहाट
काँग्रेसचा पारंपरिक मुस्लिम जनाधार मोठ्या प्रमाणात एम.आय.एम.कडे वळल्यामुळे एमआयएमने 15 जागा जिंकत ‘सेकंड लार्जेस्ट पार्टी’चा दर्जा मिळवला. यामुळे शहरातील अल्पसंख्याक राजकारणात काँग्रेसची जागा एमआयएमने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेड मनपा निवडणुकीत विकासाऐवजी जात-धर्माचे राजकारण..?
या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा धार्मिक व जातीय समीकरणे अधिक प्रभावी ठरल्याचेही ठळकपणे समोर आले आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांपेक्षा मतदारांचे ध्रुवीकरण प्राधान्याने झाले नाही, हे लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
एकूणच, नांदेड महानगरपालिका निवडणूक ही काँग्रेससाठी मोठी इशाराघंटा ठरली असून, मुस्लिम जनाधार गमावणे, नेतृत्वातील बदल आणि बदलती राजकीय रणनीती यांचा सखोल आढावा न घेतल्यास पक्षासाठी आगामी निवडणुका अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS