Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचाल तर वाचाल आणि लिहाल तर जगाल : डॉ.बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः ग्रंथ हे गुरु असून भूतकाळातील लेखनपुण्याई हाती, माथी वर्तमान व भविष्यकाळाला गती देते. त्यासाठी आजच्या पिढीने वाचाल तर वाचाल आणि लिहाल

भास्कर वाव्हळ यांचे निधन
’संतश्री’ पुस्तक म्हणजे संतवृत्तीचा शब्दसंस्कार : डॉ.बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर

श्रीरामपूर ः ग्रंथ हे गुरु असून भूतकाळातील लेखनपुण्याई हाती, माथी वर्तमान व भविष्यकाळाला गती देते. त्यासाठी आजच्या पिढीने वाचाल तर वाचाल आणि लिहाल तर जगाल हा जीवनमंत्र सदैव कृतीत आणावा, असे आवाहन वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.
  श्रीरामपूरमधील मोरगे वस्तीवरील अ‍ॅङ्. हरिश्‍चंद्र नाईक आणि सौ. चंद्रकला नाईक यांनी साहित्य परिसंवाद, हळदीकुंकू आणि संक्रांत सन्मान सोहळा आयोजित केला होता, त्याप्रसंगी साहित्य परिसंवादात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे होते. प्रारंभी सौ. चंद्रकला नाईक यांनी स्वागत, प्रास्ताविक करून हळदीकुंकू, सक्रांत वाण उपक्रमाचे महत्त्व सांगून महिलांचा सन्मान केला तर अ‍ॅङ्. हरिश्‍चंद्र नाईक यांनी साहित्यिकांना ’थापी आणि ओळंबा’ या आत्मचरित्राचे वितरण करून आपल्या या लेखनाचे प्रेरणास्थान डॉ. बाबुराव उपाध्ये असून या आत्मचरित्राला सार्थ आकार देण्याचे काम डॉ. शिवाजी काळे यांनी केल्याचे सांगून अनेकांचे ऋण व्यक्त केले. यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मोहिनी काळे, सौ. शैलेजा सदावर्ते, सौ. निर्मला सोनवणे, सौ. लिलाबाई झडे, सौ.निर्मला निकम, माजी शिक्षणाधिकारी अनिल सदावर्ते, माजी इन्स्पेक्टर, मुख्याध्यापक राजाबापू झडे आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांना ’संतश्री’,’ शब्द वाटू धन जनलोका’ आदी पुस्तके देऊन ग्रंथांचे जीवनातले महत्त्व सांगून वाचन ही मानसिक, बौद्धिक, संस्कृतीपूजक,ज्ञानशील आणि सकारात्मक दृष्टी देणारी भक्ती आहे, अशी वाचन भक्ती केली तरच जीवन शक्ती वाढते असे सांगून अ‍ॅड. हरिश्‍चंद्र नाईक यांनी अंधत्त्व असतानाही ’थापी आणि ओळंबा’ सकस आत्मचरित्र लिहिले, त्या लेखनाची शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन उपयुक्तता स्पष्ट केली.

सत्यकथन आणि खरे संतत्त्व अंगी बाणावे:- डॉ. शिवाजी काळे
अ‍ॅड. हरिश्‍चंद्र नाईक यांनी आपल्या आत्मचरित्रातून सत्यकथन केले आहे. डोळे अधू असतानाही त्यांनी अडचणीवर मात करीत आपले अनुभव लिहिले आहे. त्यांनी चांगले जग पाहिले आहे, आताचे जग पाहवे असे फारसे काही राहिले नाही, जेथे दिव्यत्व असेल तेथेच नमावे, आज जास्त प्रमाणात ढोंगी साधुत्व वाढले आहे. आर्थिक स्वार्थ आणि दांभिकता वाढली आहे, जेथे देवत्व नसते, तेथे वेळ

COMMENTS