Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकार्‍यांची अवैध उत्खननावर धडक कारवाई

लोहा तालुक्यातील येळी नदीपात्रातून 3 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तनांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात जिल्ह

जाहीरनाम्यांची फॉरेन्सिक तपासणी; भाजपचा आरोप काँग्रेस ‘कॉपी-पेस्ट’, राष्ट्रवादी ‘फोटो-पेस्ट’!
ज्ञानदीप विझला; परंतु विचारांचा प्रकाश अमर
नांदेड शहरातील फरांदे नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

लोहा तालुक्यातील येळी नदीपात्रातून 3 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः उपस्थित राहून धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 3 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध उत्खनन करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रविवार, दि. 11 जानेवारी रोजी मौजे येळी येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाली होती. या गंभीर माहितीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री सुमारे 10.30 वाजता थेट घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी पाहणी करत असताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. उत्खननासाठी 3 हायवा ट्रक, 7 जेसीबी यंत्रे, 1 मोठी फायबर बोट व 4 तराफे वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. तत्काळ जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व वाहने व यंत्रसामग्री तात्काळ जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान 45 ब्रास वाळूचा साठा देखील ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व वाहनांची, यंत्रसामग्रीची व वाळू साठ्याची एकूण बाजारभावानुसार किंमत 3 कोटी 32 लाख रुपये इतकी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असून, संबंधित दोषींवर महसूल व फौजदारी कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या अवैध उत्खननात सहभागी आढळणार्‍यांविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

COMMENTS