ईश्वरपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेतून ईश्वरपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्



ईश्वरपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेतून ईश्वरपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने यंदाही प्रथम क्रमांक मिळवला. सलग दोन वर्ष या महाविद्यालयाने प्रतिस्पर्धी संघावर मात करून विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेकरिता सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून संघ सहभागी झाले होते. या सहभागी संघातून 16 खेळाडूंची निवड पश्चिम विभागीय हॉकी स्पर्धेकरिता झाली. या 16 खेळाडूंमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची निवड भोपाळ येथे होणार्या स्पर्धेकरिता झाली. या महाविद्यालयाच्या आदित्य जयकर पाटील, बीए भाग 2, प्रथमेश विजय काळे, बीए भाग दोन, अवधूत संतोष काळे बीए भाग तीन या खेळाडूंचा समावेश शिवाजी विद्यापीठ संघात झाला. हा शिवाजी विद्यापीठाचा संघ शिवाजी विद्यापीठाचे भोपाळ येथे प्रतिनिधित्व करणार आहे.
सर्वांना खा. एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे समन्वयक संजय पाटील व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हेमंतकुमार नारायणकर व प्रा. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, संस्थेचे सचिव अॅड. बी. एस. पाटील, सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील तसेच संजय चरापले, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, संजय चव्हाण, एस. बी. जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS